समृध्दी महामार्गाचे य़श आणि मोपलवारांची बदनामी

1 min read

समृध्दी महामार्गाचे य़श आणि मोपलवारांची बदनामी

बोरीवलीचा एक प्लॉट आणि त्याच्याशी संबंधीत व्यवहार या संबंधीचे बोलणे फोनमध्ये रेकॉर्ड
झाले. ते विरोधी पक्षाच्या हातात दिले. विधीमंडळात गोंधळ झाला. मोपलवार यांना रजेवर
पाठविण्यात आले.
हे प्रकरण कधीचे तर मोपलवार कोकणचे विभागीय आयुक्त होते त्यावेळेसचे. मोपलवार
यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. चौकशी झाली. आणि चौकशीत एक गोष्ट लक्षात आली
की, अशा प्लॉटचा कोणताही व्यवहार सरकार दरबारी झालाच नाही.
जो संवाद होता तो देखील मोडून तोडून करण्यात आला होता. मोपलवार बदनाम होत होते.
एका राजकीय व्युहनितीचा बळी ठरत होते. हे अनेक लेखांतून सांगितल्यावर अनेकांनी मला हे
मोपलवार यांचे नाहक समर्थन आहे. याला फेवरीजमचा वास येतो असे सांगत मी पेड लेख
लिहित असल्याचे अप्रत्यक्ष पणे सांगितले. आमच्या मनासारखे लिहाल तर तर तुम्ही तटस्थ
आणि निर्भिड पत्रकार आमच्या विरोधात लिहाल तर तुम्ही पेड पत्रकार असा नवा शिरस्ता
राजकारणात येऊ लागला आहे.
मोपलवार मराठवाडी अधिकारी म्हणून त्यांच्यासाठी लिहिलं आणि जे लिहिलं ते खरं आहे हे
समोर येत आहे. मुद्रांक घोटाळ्यात मोपलवार आरोपी नव्हते तर तक्रारकर्ते होते हे पुन्हा
एकदा अधोरेखीत झाले आहे. बोरीवली प्लॉट प्रकरणात असा व्यव्हार झाला नाही हे सिध्द
झाले आहे. तर ती रेकॉर्डींग फेक होती हे देखील सिध्द झाले आहे. जो व्यक्ती हे सगळे करत
होता तो गुन्हागार हे पोलीस रेकॉर्डवर कळत आहे. जे राजकारणी आरोप करत आहेत ते
तेलगी कांडातील जामिनावर सुटलेले आरोपी आहेत हे देखील सर्वज्ञात आहे.
‘समृध्दी’ महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा लांबलचक महामार्ग. नागपूर ते
मुंबई मध्ये अमरावतीसह विदर्भाचे कांही जिल्हे आणि मराठवाड्यातील जालना औरंगाबाद
जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग परभणी बीड या जिल्ह्यांची मुंबईशी कनेक्टीव्हीटी अधीक
वेगवान करणारा हा महामार्ग. याचे यश टप्यात येऊ लागले होते. त्यासोबत त्याला होणारा
राजकीय विरोध देखील वाढू लागला होता. याच काळात राधेशाम मोपलवार हे त्या काळात
एमएसआरडीसी चे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या
सेवानिवृत्तीपूर्वीची ही शेवटची नौकरी होती.

महामार्ग मोठा असल्याने यावर खर्च देखील मोठा विरोध देखील तेवढाच मोठा. शरद पवार,
उध्दव ठाकरे या सगळ्या बड्या नेत्यांनी दौरा करत आपले विरोधाचे ईरादे स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्री जातीने या महामार्गाच्या कामाकडे लक्ष देत होते. आणि मोपलवार आपल्या
आयुष्यातील सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणून लक्ष देत होते. मोपलवारांच्या सोबत त्यांच्या शेजारी
जिल्हातील कुरूंदकर हे दुसरे सहकारी होते. दोघांचे सूर जुळलेले असल्याने कामाची गती
अधीकच वाढली होती. माध्यमांना महामार्गाची उपयुक्तता पटवून देत मराठवाडा आणि
विदर्भातील माध्यमांना ही जोडी या महामार्गाची उपयुक्तता पटवून देत होती.
भुसंपादनाच्या मार्गातील अडचणी दूर होत्या. मुख्यमंत्र्याच्या प्रयत्नामुळे राजकीय विरोध कमी
होत होता. याला विरोध करणा-या संघटनेचे प्रमुखच भुसंपादनासाठी जमिनीची रजिस्ट्री करून
देण्यास तयार झाले होते. अशा स्थितीत या महामार्गाच्या कामात बाधा आणण्यासाठी आणि
शंका निर्माण करण्यासाठी कांहीतरी करणे भाग होते. आणि मग या प्रकल्पाचे प्रमुख राधेशाम
मोपलवार यांनाच लक्ष करण्यात आले.
मोपलवार यांना बदनाम करण्यासाठी पुन्हा एकदा एका सराईत गुन्हेगाराचाच वापर झाला.
या आधी मोपलवार यांना मुद्रांक घोटाळ्यात बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. तो देखील विशेष
न्यायालयात अब्दुल करीम तेलगीने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र दाखवत आमि त्यानंतर विशेष
न्यायालयाने काढलेले समंस दाखवत. पण त्यानंतर उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आणि
त्यानंतर त्या न्यायाधिशांची सक्तीची सेवानिवृती आणि त्यानंतर सेवानिवृती विरोधात संबंधीत
न्यायाधिशांनी केलेले अपील फेटाळताना उच्च न्यायालयाने केलेली टिपण्णी व सीबीआयचे
मोपलवार यांच्याबाबतचे शपथपत्र सोयीस्करपणे झाकून ठेवण्यात आले. ज्या तेलगीवर मुद्रांक
अधिक्षक असताना मोपलवारांनी पाच गुन्हे दाखल केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी देण्यात
आलेल्या शपथपत्राचा आधार घेत तेलगी प्रकरणात जामिणावर सुटलेले लोकच हा आरोप
माध्यमांच्या समोर करत मोपलवारांची बदमानी करत होते.
दुसरा प्रकार घडला तो देखील असाच एका सराईत खंडणीबहाद्दर, बलात्काराचा आरोप
असलेला, एकाच्या आत्महत्येस जबाबदार असलेला, मॅच फिक्सींग मधील आरोपींशी म्हणजे
विंदू दारासिंह याच्याशी जवळचे संबंध असलेल्या व्यक्तीने जोडूतोडून तयार केलेल्या संवादाचा
भाग पकडून पुन्हा एकदा एका सनदी अधिका-याला त्याच्या निवृत्तीच्या दिवसात अडचणीत
आणण्यात आले. आरोप करणा-या व्यक्तीची विश्वासहर्ता देखील तपासल्या गेली नाही. धूर
निघतोय तेंव्हा जाळ असेलच हे साधे सरळ सुत्र मोपलवारांना लक्ष करताना वापरले गेले.

त्यांच्या कामामुळे त्यांना चांगली पदे मिळाली असतानाही मोपलवार यांना क्रिम पोस्टींग
त्यांच्या भ्रष्टाचारामुळे मिळाली असे सुचित करणा-या बातम्या प्रकाशीत करण्यात आल्या.
हे सगळं एका मोपलवारांना बदनाम करण्यासाठी घडत होते असे नाही. तर कोणत्याही
स्थितीत मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र आखले जात होते.
मोपलवार लक्ष झाले की त्यांच्या सोबत समृध्दीचे व्यवहार देखील संशयाच्या घे-यात येतात
आणि या प्रकल्पाची उपयुक्तता समोर येण्याऐवजी त्यातील भ्रष्टाचाराच्या सुरस कथाच अधीक
चर्चिल्या जातील आणि या महामार्गाचा वेग मंदावेल प्रसंगी मुख्यमंत्री हा प्रकल्प बंद करण्याचा
निर्णय देखील घेतील अशीच ती अटकळ होती.
एका राजकीय खेळीत मोपलवार अडकले जात होते. नव्हे त्यांचे करीयरच पणाला लागले आहे.
तेदेखील त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी अंतीम टप्यात हे सारे घडत होते. मोपलवार मराठवाडी
स्वभावाचे अधिकारी आहेत. बोलताना मोकळंढाकळं आणि प्रशासकीय आढ्यता न बाळगता
संवाद साधणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसाधारणरित्या जशी अधिकारी
मंडळी रिजर्व्ह राहतात तसे न राहता बिनधास्त अशा स्वरूपाची मोपलवार यांची वागणुक
असते. मित्र,पत्रकार, सहकारी अथवा सहकारी अधिकारी यांच्याशी बोलताना ते औपचारिकता
पाळत नाहीत तर आपलेपणा दाखवतात. सत्ता बदलली तरी आपली निष्ठा प्रशासनाशी ठेवणारे
मोपलवार म्हणूनच वेगवेगळ्या मुख्यमंत्र्याच्या काळात देखील कांहीतरी करून दाखवता येईल
अशा पदावर राहिले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रदुषण नियंत्रण महामंडऴ, एमआयडीसी,
एमएसआरडीसी,कोकण विभागीय आयुक्त अशी महत्वाची विभाग सांभाळली. त्यांच्या याच
स्वभावाचा फायदा उचलत त्यांचे संवाद रेकॉर्ड करण्यात आले. आणि त्यांना जाऴ्यात
ओढण्यात आले.
मोपलवार यांच्यावर कोणी जबाबदार आणि सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीने आरोप केले
असते तर निदान त्याला गांभिर्याने तरी घेता आले असते. ईथे एक मुद्रांक घोटाळ्यात दोषी
असलेला, दुसरा जामिनावर बाहेर पडलेला आणि तिसरा रेप, खंडणी, आत्महत्येस प्रवृत्त
करणारा अशी मंडळी आरोप करत आहेत आणि तीन दशके सेवा देणारा अधिकारी आपले
आयुष्य पणाला लावत आहे हेच खुप यातनादायक आहे.