संघावर आरोप लावताना

1 min read

संघावर आरोप लावताना

संघाच्या प्रभात शाखेत जे प्रात:स्मरण केले जाते त्यात एकात्मता स्तोत्र आणि एकात्मता मंत्र रोज म्हटला जातो. या मंत्रात संपूर्ण भारतात असलेल्या व्यक्ती, धर्म, वैज्ञानिक, महात्मे यांचा उल्लेख आहे. या पृभृतींमध्ये  टिळक, गांधीजी, महात्मा फुले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर  यांच्या नावाचा उल्लेख आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक अशी संस्था आहे ज्याचे  संघटन आणि विचार समजून न घेता
टीकाकार आणि विरोधी मंडळींच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. उपहास आणि
कट्टरतावादी अशी उपाधी लावली जाते.
संघाच्या प्रभात शाखेत जे प्रात:स्मरण केले जाते त्यात एकात्मता स्तोत्र आणि एकात्मता मंत्र
रोज म्हटला जातो.
या मंत्रात संपूर्ण भारतात असलेल्या व्यक्ती, धर्म, वैज्ञानिक, महात्मे यांचा उल्लेख आहे. या
पृभृतींमध्ये  टिळक, गांधीजी, महात्मा फुले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर  यांच्या नावाचा
उल्लेख आहे.
रोज सकाळी स्वयंसेवक या महान विभूतींची आठवण करत असतो आणि ही प्रार्थना अनेक
वर्षांपासून संघ शाखेत म्हटली जात असते. महात्मा गांधी महात्मा फुले आणि भारतरत्न
बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे पावन स्मरण स्वयंसेवक रोज करतात ती ओळ आणि
त्याचा अर्थ खाली देत आहे.
रामकृष्णो दयानंदो रवींद्रो राममोहनः
रामतीर्थोऽरविंदश्च विवेकानंद उद्यशः ॥२८॥
दादाभाई गोपबंधुः टिळको गांधी रादृताः
रमणो मालवीयश्च श्री सुब्रमण्य भारती ॥२९॥
सुभाषः प्रणवानंदः क्रांतिवीरो विनायकः
ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरुः ॥३०॥
संघ हिंदुत्ववादी आहे असे सांगताना संघ अन्य धर्मियांचा द्वेष करतो असा प्रचार देखील केला
जातो पण भारत देशातील अन्य धर्माचा आदर संघ करत आला आहे. खरेतर संघ स्वयंसेवक
मंडळींना या परंपरा उच्च असल्याची जाणीवच संघ करून देत असतो.
चतुर्वेदाः पुराणानि सर्वोपनिषदस्तथा
रामायणं भारतं च गीता षड्दर्शनानि च ॥८॥
जैनागमास्त्रिपिटकः गुरुग्रन्थः सतां गिरः
एष ज्ञाननिधिः श्रेष्ठः श्रद्धेयो हृदि सर्वदा॥९॥
श्रेष्ठ धार्मिक पुस्तकात चार वेद, अठरा पुराण, सर्व उपनिषद, रामायण, महाभारत, गीता,
षटदर्शन जैन शास्त्र आगम, बौद्ध धर्म त्रिपिटक आणि संताची वाणी गुरु ग्रंथ साहिब सारखे
ज्ञान  भंडार, श्रेष्ठ, वंदनीय ग्रंथाना आपण सदैव ह्रदया मध्ये धारण करु.

केवळ हिंदूच नव्हे तर जैन, बौद्ध, शीख, या सर्वच विचारांची आठवण आणि सन्मान संघ ठेवतो.
एक बाब लक्षात घेतली पाहिजे की मुस्लिम आणि ख्रिस्ती हे धर्म भारतीय नाहीत त्यामुळे
त्याचा भारतीय परंपरांच्या मंत्रात वा स्त्रोत्रात उल्लेख आढळत नाही.
या महनीय व्यक्तीसोबत भारतातील महान राजा ज्यांनी स्वतंत्र राखण्यासाठी अभिमानस्पद
असा लढा दिला ते आणि भारतीय वैज्ञानिक यांचाही आदराने उल्लेख केलेला आहे. त्यांना
संघाने प्रातःस्मरणीय माणले आहे.
मुसुनूरिनायकौ तौ प्रतापः शिव भूपतिः
रणजितसिंह इत्येते वीरा विख्यात विक्रमाः ॥२५॥
मुसून अरि नायक (प्रोलय नायक, कप्पा नायक), महाराणा प्रताप, छत्रपति शिवाजी महाराज,
आणि महाराजा रणजीत सिंह आदि विख्यात वीर यांचे बळ आमच्यात संचार करो
 
वैज्ञानिकाश्च कपिलः कणादः शुश्रुतस्तथा
चरको भास्कराचार्यो वराहमिहिर सुधीः ॥२६॥
वैज्ञानिकामध्ये कपिल, कणाद, सुश्रुत (महान सर्जन), चरक, भास्कराचार्य, बुद्धिमान
वराहमिहिर ॥२६॥ 
नागार्जुन भरद्वाज आर्यभट्टो वसुर्बुधः
ध्येयो वेंकट रामश्च विज्ञा रामानुजायः ॥२७॥
नागार्जुन, भारद्वाज, आर्य भट, बुद्धिमान जगदीश चन्द्र बसु, सी. वी. रमन आणि रामानुजन
सतत ध्यान करावेत असे आहेत॥२७॥ 
संघाचा हा एकात्मता मंत्र आणि प्रार्थना संघ केवळ वंदन करत नाही तर पुढच्या पिढीला याची
सतत आठवण करून देत असतो. हा एकात्मता मंत्र देशाच्या वैभवशाली परंपरेची आठवण
करून देतोच पण त्या ज्ञात व अज्ञात वीरांची आठवण आणि कार्याची महती सांगत राहतो.
अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरण संसक्तहृदयाः
अविज्ञाता वीरा अधिसमरमुद्ध्वस्तरि पवः
समाजोद्धर्तारः सुहितकर विज्ञान निपुणाः
नमस्तेभ्यो भूयात्सकल सुजनेभ्यः प्रतिदिनम्‌ ॥ ३२॥

भारत मातेच्या चरणावर प्रेम करणाऱ्या, युद्धभूमीत 
 मातृभूमीसाठी  शत्रुच्या स्वप्नाला  ध्वस्त करणारे अज्ञात वीर, महान समाज सुधारक आणि
पर्यवेक्षण च्या माध्यमातून  समाज कल्याण करणाऱ्या कुशल वैज्ञानिक आणि समस्त सज्जन
व्यक्तींना नमस्कार असो ॥ ३२॥ 
ही भावना आणि विचार कुठे गैर आहेत याचा विचार नक्कीच करावा लागेल. संघाच्या
प्रातःस्मरणात आणखी एक मंत्र ज्याला एकात्मता मंत्र म्हटले जाते तो स्वयंसेवकांच्या कडून
म्हणवून घेतला जातो. तो असा आहे.
यं वैदिका मन्त्रदृशः पुराणाः इन्द्रं यमं मातरिश्वानमाहुः
वेदान्तिनो निर्वचनीयमेकम् यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति॥

शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति।
बुद्धस्तथार्हन् इति बौद्ध जैनाः सत् श्री अकालेति च सिक्खसन्तः॥

शास्तेति केचित् कतिचित् कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या।
यं प्रार्थन्यन्ते जगदीशितारम् स एक एव प्रभुरद्वितीयः॥
याचा अर्थ असा होतो.. प्राचीन काळातील मंत्र दृष्ट्या ऋषिमुनींनी ज्याला इंद्र यमादी नावांनी
हाक मारले आहे. ज्याला वेदांत ब्रह्म असे देखील म्हटले जाते. शैव उपासक ज्याची शीव म्हणून
आराधना करतात. वैष्णव उपासक ज्याची विष्णू म्हणून आराधना करतात बौध्द ज्याला बुध्द
या नावाने आराध्य समजतात. जैन ज्याला अरिहंत नावावे ओळखतात. आणि सिख ज्याचा सत
श्री अकाल म्हणून जयघोष करतात कोणी त्याला नियंत्रक म्हणते कोणी त्याला स्वामी म्हणते.
तर कोणी त्याला माता, पिता असं भक्तीपूर्वक संबोधते. तो प्रभू एकच आहे. अद्वितीय आहे.
  तथागत गौतम बुध्द असो की वर्धनाम महाविर की असोत गुरू ग्रंथ साहिब सगळ्याचा
सन्मान हिंदू धर्मातील देवतांच्या इतकाचा करावा अशी प्रार्थना सकाळी संघशाखेत म्हणवून
घेणे चुक कसे असू शकेल.
जरा संघाच्या रोजच्या प्रार्थनेकडे वळूत संघ शाखेवर संस्कार करणारी याच त्या गोष्टी आहेत
ज्यातून स्वयंसेवक प्रेरणा घेत असतो. आणि त्याची वैचारिक बैठक बसत असते.
संघाची पूर्ण प्रार्थना आणि त्याचा अर्थ आधी समजून घेऊ मग त्यावर भाष्य करू.
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे

पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।
भारत माता की जय ।।
शाखा संपत असताना ही प्रार्थना म्हटली जाते या प्रार्थनेचा स्वच्छ मराठीतला अर्थ समजून
घेऊया..
हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण
केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला
पुनःपुन्हा वंदन करतो. हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम
करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबध्द झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला
तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील
अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही. असे शुध्द चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व
नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा
काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल. उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी
ऐहिक समृध्दी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची
भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या
अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटीत कार्यशक्ती

आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ
होवो. भारत माता की जय

या प्रार्थेनेत चांगले चारित्र्य दे, ज्या चारित्र्यापुढे विश्व नतमस्तक होईल अशी प्रार्थना करण्यात
गैर ते काय.. मातृभुमीची सेवा करण्याची वृत्ती अंगी असावी तसेच ज्ञानाच्या जोरावर
काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग देखील सुखकर व्हावा अशी प्रार्थना करण्यात संघ वाईट काय
शिकवतो आहे तेच समजत नाही.