....तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं- देवेंद्र फडणवीस

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीका

....तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं- देवेंद्र फडणवीस

नागपुर : ईडीच्या कारवायांवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात केंद्र सरकारवर जोरदार टिका केली होती. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सींचा करण्याच्या विरोधात आहेत. ते कधीच एजन्सीचा गैरवापर करत नाहीत. आम्ही यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

...तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असंत

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ईडी, सीबीआय याचं भय कुणाला असेल? ज्याने काही केलं असेल त्याला भय असेल. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एजन्सीजच्या वापराच्या विरोधात आहेत. ते कधीही एजन्सीजचा गैरवापर करु देत नाहीत. एजन्सीच्या कामात ते मध्ये येत नाही आणि वापरही करत नाहीत. अन्यथा एजन्सीचा वापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये असतं. पण आण्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोकं आहोत.

गेल्या काळात काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी एजन्सीजचा दुरुपयोग केला तसा दुरुपयोग आम्ही कधीच करणार नाही, आमचे नेतेही करणार नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे भ्रष्टाचार खनुन काढल्याशिवाय मोदीजी स्वस्थ बसणार नाहीत. जे भ्रष्टाचारी असतील त्यांनी घाबरायचं आणि जे भ्रष्टाचारी नसतील त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.