...म्हणुन राज ठाकरेंनी मास्क लावला

राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली

...म्हणुन राज ठाकरेंनी मास्क लावला

पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या नियमाला नेहमीच फाटा दिल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. पण काल पुण्यात राज ठाकरे मास्क घातलेले पाहायला मिळाल आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळी राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. कालच्या भेटीत एक विशेष गोष्ट म्हणजे, राज ठाकरे यांनी आज मास्क लावला होता.यावेळी राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी मंगळवारी राज ठाकरेंनी ही भेट घेतली. बाबासाहेब पुरंदरे पुढच्याच आठवड्यात वयाची ९९ वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचं वयोमान आणि संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज ठाकरेंनी मास्क लावत काळजी घेतल्याचं दिसतं.

दरम्यान, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्यातला जिव्हाळा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राज ठाकरे ज्या ज्या वेळी पुणे दौऱ्यावर असतात त्यावेळी ते हमखास पुरंदरे यांची भेट घेत असतात. २०१९ मध्ये अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी खुद्द राज ठाकरे हे पुणे येथील निवासस्थानी आले होते. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंनी देखील लग्नाला उपस्थिती लावत अमित आणि मितालीला आशीर्वाद दिले होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.