...तर आम्ही संभाजीनगर नामांतराला पाठिंबा देऊ- पटोले

औरंगाबादचे नामकरण करून जनतेचे प्रश्न सुटणार असतील तर काँग्रेसचा कोणत्याही नावाला विरोध नाही...

...तर आम्ही संभाजीनगर नामांतराला पाठिंबा देऊ- पटोले

औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणले की, 'औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची हीच योग्य वेळ आहे'. त्यांच्या याच वक्तव्यावरुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, ‘वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी अशा प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. काँग्रेससाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण, या प्रश्नांना बगल देण्यासाठी भावनिक विषय पुढे आणले जातात. औरंगाबादचे नामकरण करून जनतेचे प्रश्न सुटणार असतील तर काँग्रेसचा कोणत्याही नावाला विरोध नाही’, असे पटोले म्हणाले.

‘व्यर्थ न हो बलीदान’ या उपक्रमाअंतर्गत सोमवारी काँग्रेसतर्फे पटोले यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉँग्रेस स्वबळावर लढणार आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही, असे त्यांनी नमूद केले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ‘संभाजीनगर’ नामकरणाची हीच योग्य वेळ आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यावर पत्रकारांनी विचारला असता पटोले यांनी सध्या जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. शेतकऱ्याचे प्रश्न आहेतच, ते काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांना बगल देण्यासाठीच भावनिक प्रश्‍न वारंवार समोर आणले जातात. शहराचे नाव बदलण्याने हे प्रश्‍न सुटणार असतील तरी काँग्रेसचा नाव बदलण्यास विरोध नाही, असे पटोले म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.