रिया-सुशांतच्या ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील काही नावे एनसीबीच्या रडारवर

•रिया चक्रवर्तीकडून ड्रग्स प्रकरणात सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा सह 25जणांची नावे समोर, काय असेल एनसीबीची कारवाई ?

रिया-सुशांतच्या ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील काही नावे एनसीबीच्या रडारवर

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह 6 लोकांना अटक केले आहे. माहितीनुसार रिया चक्रवर्तीने एनसीबी समोर ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत. शौविक आणि रियाच्या व्हॉट्सअँप चॅटमधून याबाबत माहिती मिळाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार एनसीबीच्या रडारवर आता अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा ही नावे आहेत, कारण ही नावे रियाने घेतली असल्याची माहिती आहे.

रिया चक्रवर्तीने तपासामध्ये बॉलिवूड मधील काही नव्या कलाकारांसह एकूण 25 जणांची नावे घेतली आहेत. ज्यांना चौकशीसाठी एनसीबी बोलवण्याच्या तयारीत आहे. हे सेलिब्रिटी ड्रग्स घेत असल्याची माहिती रियाने एनसीबीला दिली आहेत. याच माहितीच्या आधारे आज एनसीबी मुंबई-गोव्यामध्ये छापे टाकत आहे. तर शौविकला ड्रग्ससाठी रिया कधी कधी आपल्या अकाउंट मधून पैसे काढून देत असल्याची कबुली दिली तर सॅम्युअलने सुद्धा या माहितीला दुजोरा देत रियाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. सॅम्युअल आणि शौविक दोघांनीही रिया ही सुशांतसाठी ड्रग्स मागवत असल्याची कबूली दिली आहे. तसेच दोघांनी सुशांतच्या पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर व्हायचा आणि कोण कोण त्याचे सेवन करायचे याचीही माहिती दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.