पैठणच्या पाण्याने काही गावांचा संपर्क तुटला!

1 min read

पैठणच्या पाण्याने काही गावांचा संपर्क तुटला!

नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान! शासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करत तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.

सिध्देश्वर गिरी/परभणी: पश्चिम महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाने पैठण येथील नाथसागर प्रकल्प ओसंडून वाहत असतानाच. मराठवाडयातही मागील दहा दिवसापासून पडणाऱ्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाले आहे. २६ सप्टेंबर रोजी पैठण येथील नाथसागर प्रकल्पातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने. त्याचा तडाका परभणी जिल्ह्यातील बहुतांश गावांना बसल्याचे चित्र दिसत होते.
WhatsApp-Image-2020-09-27-at-3.03.57-PM-1
सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील खडका मार्ग बंद झाल्याने कान्हेगावचा संपर्क काही काळासाठी तुटला होता तर पाथरी तालुक्यातील डाकूपिंपरी, लिंबा, विटा(बु.) येथील गोदकाठच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्रही दिसून येत होते. यात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सोनपेठ-पाथरी या रस्त्यावर लिंबा येथे गोदावरीच्या पाण्याचा वेडा ओढ्याच्या मार्गाने रस्त्यावर आल्याने हा रस्ता बंद झाला होता, यामुळे काही वेळेसाठी वाहतूक ठप्प झाली होती.शासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करत तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.