कोणी केले अमृता फडणवीसांच्या गाण्याचे कौतुक

'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी अमृता फडणवीस यांचे गाण प्रदर्शित

कोणी केले अमृता फडणवीसांच्या गाण्याचे कौतुक

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या सोशल मीडिया वर नेहमीच चर्चेत असतात. महिला दिना निमित्त त्यांनी गाण प्रदर्शित केल आहे. या गाण्याचे कौतुक रोहित पवार यांनी ट्विट द्वारे केले आहे.

महिला दिनाचे औचित्य साधत अमृता फडणवीस यांनी एक नवीन गाण प्रदर्शित केले आहे. 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी,'असे या गाण्याचे बोल असून हे गाणे नाट्य संगीतावर आधारीत आहेत. अमृता फडणवीस यांच्या या गाण्यावर रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उठवला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असे नाही, पण ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.