परभणी/सिध्देश्वर गिरी: अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा तडाका बसला आहे. यात विजेच्या कडकडासह झालेल्या पावसामुळे कान्हेगाव येथील दहा वर्षीय लक्ष्मण गोविंद दुगाने वीज पडून जखमी झाला होता. मात्र गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
तर दुसऱ्या घटनेत वीज पडुन सायखेडा येथील शेतकरी नवनाथ मारोती अरचिडे यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला.या दोनही घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे.मागील अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या संकटाने शेतकऱ्यांची झोप उडवल्याचे चित्र असतानाच सहा दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने अवकाळीच्या रूपाने पुन्हा एकदा तडाका दिला आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वच पीक हातून गेले असल्याने आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू नसल्याने मदतीबाबत शेतकरी संभ्रमात आहेत.
सोनपेठमध्ये वीज पडून एक बालक मृत्यूमुखी! तर बैलही दगावला.
पंचनाम्याची प्रक्रिया सुरू नसल्याने मदतीबाबत शेतकरी संभ्रमात.

Loading...