सोनपेठची वाळू लातूरला!

तहसील प्रशासन कारवाईसाठी सरसावले

सोनपेठची वाळू लातूरला!

सोनपेठः सोनपेठ तालुक्यातील गोदावरी म्हणजे सोन्याची खान समजल्या जाते.ही सोन्याची खान वाळू माफियासाठी पर्वणी ठरत आहे.तालुक्यातील पोंहडुळ येथील अधिकृत वाळू धक्क्यावरून अनधिकृत वाळू उपसा चालू असून या वाळू वाहतुकीला राजकीय अभय असल्याने कार्यवाही करण्यात येत नसल्याची चर्चा होत होती.मात्र उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीच्या अनुषंगाने सोनपेठचे तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ महसूल प्रशासन कार्यवाही करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

सोनपेठ तालुक्यातील पोहंडुळ येथील वाळू लातूरला जात असल्याने तालुक्यातील वंदन येथे सोमवार रोजी महसूल प्रशासनाने तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वाळूच्या वाहनावर कारवाई केली आहे.यात नायब तहसीलदार अनिल घनसावंत,साहेबराव घोडके,तलाठी राजकुमार चिकटे,सागर मस्के,आदींनी कार्यवाही करून सदरची दोन वाहने तहसील कार्यालयात लावली आहेत.सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई करून यांच्याकडून ६ लाख ९१ हजार दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.