सोनपेठला मिळणार शिकाऊ तहसिलदार

1 min read

सोनपेठला मिळणार शिकाऊ तहसिलदार

परिविक्षाधीन तहसिलदार म्हणून महसुलचा पदभार कु.गिरी यांच्याकडे

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: परभणी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या सोनपेठ तालुक्याला आता शिकाऊ तहसिलदार म्हणून नायब तहसिलदार महसुलचा पदभार कु.ऐश्वर्या गिरी यांच्याकडे आला आहे.महाराष्ट्र सरकारने २०१७-१८च्या परीक्षेतील भावी अधिकाऱ्यांना उशिरा नियुक्तीपत्र दिले आहे.तांत्रिक अडचणीमुळे तब्बल एक वर्ष या भावी अधिकाऱ्यांना प्रलंबित राहावे लागले होते.
या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मागील वर्षी सरकारने देऊन प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवले आहे.यात या अधिकाऱ्यांना त्यांच्यातील निर्भीडता जागी व्हावी व सामान्यांना न्याय मिळण्यासाठी कठीण विभागाचा पदभार देण्याचे शासनाचे प्रशासकीय धोरण लक्षात घेता.ऐश्वर्या आनंदराव गिरी यांना २७ आठवड्यात त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे.त्यांची नियुक्ती ११ मार्च २०२० पासून परभणी उपविभागात होती.मात्र एकत्रीत परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम ५ मध्ये त्यांना २७ आठवड्याच्या प्रशिक्षण कालावधीसाठी नायब तहसिलदार महसुल सोनपेठ म्हणून स्वतंत्र नियुक्ती देण्यात देण्यात आली आहे.एकंदर मागील दोन वर्षापासून तहसिलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी सामान्यांना न्याय देण्यासाठी झपाटुन काम केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अद्यायावत राहून सर्व विभागप्रमुखांना कडक सुचना करत कोरोना सोनपेठपासून विभक्त करण्याचे काम प्रभावीपणे केले आहे.महसुल यंत्रणाही त्यांनी कामाला लावली आहे. ऐश्वर्या गिरी यांची नियुक्ती झाल्याने प्रशासकीय कामे करताना मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचे बिरादार यांनी सांगितले आहे.