सोन्यासाठी नातेवाईकांनी केली बहिण भावाची हत्या

1 min read

सोन्यासाठी नातेवाईकांनी केली बहिण भावाची हत्या

एक किलो सोन्यासाठी चुलत भाऊ आणि मेहुण्याने केली बहिण भावाची हत्या

स्वप्नील कुमावत/औरंगाबादः शहरातील सातारा परिसर भागात 8 जुन रोजी भरदिवसा किरण आणि सौरभ या बहिण भावाच्या निर्घृण हत्येने शहराला हादरवून टाकले होते. या हत्येमागील रहस्य उलगडले असून घरात ठेवलेल्या किलोभर सोन्यासाठी चुलत भाऊ आणि त्याच्या मेव्हण्यानेच ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने दोन्ही आरोपीना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे. सतीश काळूराम खंदाडे रा. पाचन वडगाव, अर्जुन देवचंद राजपूत रा. वैजापूर असे अटकेतील दोघांची नावे आहेत. अटकेतील आरोपी सतीश हा सौरभचा चुलत भाऊ आहे तर अर्जुन हा त्याच्या मेव्हुणा आहे.
9 जुन रोजी मयताची आई अनिल लालचंद खंदाडे ह्या सकाळी 10 वाजेच्या सुमारास जालना येथे आल्याचे कळताच सतीश खंदाडे याने जालना येथुन तीन चाकू विकत घेवुन औरंगाबाद येथे 12 वाजेच्या सुमारास मयतांच्या घरी आले, त्यानंतर घरी चहा पिले, कॅरम खेळले, त्यानंतर 5 वाजेच्या दरम्यान घरातील बाथरुम मध्ये सौरभ खंदाडे यास घेवुन जावून स्वतःजवळील चाकुने दोन्ही आरोपीनी त्याच्या गळा कापुन त्याचा खुन केला. सौरभाच्या आवाजाने घराच्या पहिल्या मजल्यावरील किरण खंदाडे ही अंघोळ करुन खाली आली. तिचा सुध्दा धारदार चाकुने गळा कापुन खून केला. सदर घरातील सोन्याचे दागीने घेवुन घरातुन जालनाकडे रवना झाले. 10 जुन रोजी गुन्ह्यातील दोन्ही आरोपी जालना येथुन वैजापुरकडे मुद्देमालासह रवाना झाल्याची खात्रीलायक गुप्तबातमी गुन्हेशाखेस मिळाल्यने त्यांना औरंगाबाद येथे सापळा लावून सपोनि वावळे व त्यांच्या पथकाने पतडून त्यांच्या ताब्यातून सदर गुन्ह्यात चोरी गेलेला काही मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आणि दुहेरी हत्यातांडाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.