दक्षिणी सिनेमातले चरित्र अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

1 min read

दक्षिणी सिनेमातले चरित्र अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

शिक्षकी पेशा सोडून अभिनयाच्या वाटेवर यश व चाहत्यांचे अमाप प्रेम मिळवणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे जयप्रकाश रेड्डी...

दक्षिणी सिनेमातले चरित्र अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लॉकडाउन काळात ते आपल्या गुंटूर येथील मूळ गावी जाऊन राहिले होते. आज सकाळी चक्कर आल्याने स्नानगृहात ते कोसळले. उपचारापूर्वीच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. ते ७३ वर्षांचे होते.
jayreddy
खलपुरुष असो की विनोदी भूमिका. कधी नायकाचा काका तर कधी नायिकेचा बाप. शर्टच्या कॉलरमधून धारदार कोयता काढताना किंवा मांडीवर हात थोपटुन नायकाला चैलेंज देताना आपण बहुतेक दक्षिणी सिनेमात पाहिलंच आहे.
शिक्षकी पेशा सोडून अभिनयाच्या वाटेवर यश व चाहत्यांचे अमाप प्रेम मिळवणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे जयप्रकाश रेड्डी...