सोयाबीनला मिळाला ४ हजार ५१ रुपये दर.

1 min read

सोयाबीनला मिळाला ४ हजार ५१ रुपये दर.

शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न

सिध्देश्वर गिरी/परभणी: सोनपेठ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळवून देण्यासाठी सभापती राजेश विटेकर हे सतत प्रयत्नशील असतात. त्यासाठी ते व्यापाऱ्यांना सतत मार्गदर्शन करत शेतकऱ्यांचे समाधान करण्याच्या सूचना देतात. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अशोक भोसले,हारुन सय्यद,विश्वंभर रोडे यांच्यासह कर्मचारीही परिश्रम घेऊन शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असतात.
WhatsApp-Image-2020-10-19-at-2.16.54-PM
यावर्षी सोयाबीनच्या हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसव आणली आहेत.त्यामुळे हाती येणारे सोयाबीन मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचे प्रकार दिसून आले .मात्र थोड्या प्रमाणात असणाऱ्या सोयाबीनवर शेतकऱ्यांना वेळ मारुन न्यावी लागणार आहे.यामुळे हाती असणाऱ्या सोयाबीनला चांगला दर मिळाल्यास शेतकऱ्यांचे काही प्रमाणात भले होईल ही अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती.सोनपेठला असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात या सोयाबीनचे बिट नुकतेच पार पडले यात ४ हजार ५१ रुपये सर्वाधिक दर सोयाबीनला मिळाल्याने शेतकऱ्यांनी काही प्रमाणात का होईना समाधान व्यक्त केले आहे.यावेळी या खरेदीवेळी व्यापारी शाम पापंटवार,विनोद पवार,केशव भोसले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.