जालन्यातील ठिबक सिंचनाची विशेष पथकाकडून तपासणी - दादा भुसे

1 min read

जालन्यातील ठिबक सिंचनाची विशेष पथकाकडून तपासणी - दादा भुसे

अनेक शेतकऱ्यांनी थेट आपल्याकडे संपर्क साधून तक्रारी केल्या आहे- दादा भुसे

जालना: जालना जिल्ह्यात ठिबक तसेच तुषार सिंचनाचे संच बसविण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची स्वतंत्र पथका मार्फत तपासणी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा), पंतप्रधान सिंचन योजना याअंतर्गत कमीतकमी पाण्याचा वापर करुन शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पादन मिळावे आणि तुषार संच बसविण्यासाठी विशेष योजना आहे. या योजनेत जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी थेट आपल्याकडे संपर्क साधून तक्रारी केल्या आहे. असे दादा भुसे म्हणाले. आता या सिंचन प्रकाराची विशेष पथकाकडून चौकशी करणार आहे.  असल्याचे  दाद भुसेंनी सांगितले.