सप्टेंबर मध्ये शाळा पुन्हा सुरु

1 min read

सप्टेंबर मध्ये शाळा पुन्हा सुरु

केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची बैठक

नवी दिल्ली : केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत देशातील शाळा सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. बैठकीत शाळा सुरू करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. मात्र शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारचा असेल. शाळा कशी सुरु करायची, विध्यार्थ्यांना शाळेत कसे आणि कधी आणायचे हा निर्णय राज्य सरकारानेच घ्यायचा आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शाळा सॅनिटाइज करणे, पहिल्या १५ दिवसांमध्ये १० ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ शकते. त्यानंतर सहावी ते नववीचे वर्ग सुरु केले जाऊ शकतात.
एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना एकाच दिवशी शाळेत बोलावले जाणार नाही. प्रत्येक तुकडीला दिवस ठरवून दिला जाईल. शाळांना दोन शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले जाऊ शकते. ही वेळ सकाळी ८ ते ११ आणि १२ ते ३ अशी असू शकते. प्राथमिक आणि पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याबद्दल कोणतीही योजना नाही.

शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत शाळा पुन्हा सुरू करणे हे एक आव्हान आहे . तसेच शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक ती काळजी राज्य सरकाराने घ्यायची असल्यामुळे याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकारचाच असल्याचेही ठरवण्यात आले. शाळा सुरू करताना कोरोनाला प्रतिबंधात्मक , सर्व उपाययोजना करणे. त्याचे निरीक्षण केल्यानंतरच शाळा सुरू करण्यास परवानगी देणे आवश्यक असल्याचे बैठकीत ठरले आहे.