बुडत्या वाझेला स्टेनचा आधार

सचिन वाझेंच्या ह्रदयाची शस्त्रक्रीया करणे गरजेचे असल्याने न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे, पण आपल्याला स्टेन स्वामीसारखं मरायचं नाही असं वाझेंनी म्हटलं आहे.

बुडत्या वाझेला स्टेनचा आधार

महाराष्ट्रः सचिन वाझेला अठ्ठावीस दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आणि यात वाढ होण्याची शक्यता असतानाच सचिन वाझेच्या ह्रदयाच्या धमण्यांमध्ये ९० टक्के ब्लॉकेजेस निघाले. त्यानंतर ओपन हार्ट शस्त्रक्रीया करण्याची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानुसार वाझेला आता सुराणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयात आणखी एक घटना घडली, सचिन वाझेचे सहकारी अधिकारी सुनिल माने जवळ जवळ बसले होते आणि एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना विशेष न्यायालयाने अंतर ठेऊन बसण्याचा आदेश दिल्याच्या बातम्याही येत आहेत. ते दोघे काय बोलत होते याचा अंदाज आता बांधावा लागेल कारण त्यांच्यातल्या संबंधांचाच परिपाक म्हणजे या सगळ्या घटना आहेत.

सचिन वाझेंनी न्यायालयासमोर मुक्ततेचा अर्ज लिहिला आहे  आणि त्यात ह्रदयाच्या शस्त्रक्रीयेसाठी रुग्णालयात राहण्याची परवानगी द्यावी असं त्यात म्हटलं होतं. याच वेळी एनआयए त्यांच्या कोठडीची मागणी करत होतं. कारण ईडीने काही गोष्टी तपासल्या आहेत त्यात काही आर्थिक गोष्टी समोर आल्या आहेत, रक्कम समोर गेली आहे त्याबाबत तपास करायचा आहे, आणखी काही लोक यात सापडले आहेत त्यांचीही चौकशी करायची होती म्हणून ही मागणी करण्यात आली होती. पण त्यांना ह्रदयाच्या शस्त्रक्रीयेची गरज आहे आणि सुराणा रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रीया होणार आहे असं न्यायालयाने त्यांची कस्टडी नाकारताना सांगितलं. या सगळ्या प्रकारात एक अतिशय रंजक बातमी समोर आली आहे. त्यात "मला स्टेन स्वामी सारखं तुरुंगात मरायचं नाही" असं वाझेने म्हटलं आहे. मुळात स्टेन स्वामींचा मृत्यु आजारांमुळे तुरुंगात झाला आहे.

एखाद्या आरोपीला तो आजारी आहे म्हणून मुक्त राहण्याची परवानगी मिळावी की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. हा स्टेनचा आधार घेण्यामागची भुमीकाही स्पष्ट आहे. एनआयएनेच स्टेन स्वामीला अर्बन नक्षलवादाच्या आरोपावरुन अटक केली होती. याच एनआयएने स्फोटकं घडवण्याच्या कटावरुन वाझेला अटक केली आहे. एनआयएच्या अटकेत असलेल्या स्टेन स्वामींचा आजाराने मृत्यु झाला आणि त्याचा आधार घेत मला त्यांच्यासारखं मरायचं नाही असं वाझेंनी म्हटलं आहे. मुळात या सगळ्या प्रकरात मनसुख हिरेण सारख्या ज्या लोकांचे जीव गेले आहेत, ती माणसं नव्हती का? त्यांचा जीव गेला. मात्र वाझेंनी आपला जीव जाऊ नये अशी मागणी न्यायालयाकेडे केली, अर्थात न्यायालयानेही ती मान्य केली. पण स्टेन स्वामीसारखं मरायचं नाही असं सांगुन वाझेंनी स्टेन स्वामीच्या मृत्युवरही संशय व्यक्त केला आहे. उ्दया याच मुद्द्याचं भांडवल केलं जाईल.

एकीकडे राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री ज्या व्यक्तिचं समर्थन करत होते, तोच व्यक्ति आरोपी निघाला. या व्यक्तिच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री आधिच्या सरकारवर दबाव आणत होते आणि आता सरकार आसताना आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं वारंवार सांगितलं गेलं. अगदी नियम डावलुन त्याला कार्यकारी पदावर नियुक्ति दिली तेव्हाही त्याला काही अडचण नव्हती. ‌‌आता वाझेने हे वाक्य म्हंटल्याबरोबर समस्त पुरोगाम्यांना स्टेन स्वामी आणि वाझेच्या मृत्युचा नवा मुद्दा चर्चेसाठी मिळणार आहे. ‌पुरोगाम्यांची हीच पद्धत आहे, त्याला मदत व्हावी म्हणूनच वाझेने कोर्टाकडे अशी विनंती केली आहे. न्यायलयाने ही विनंती मान्य केली आहे आणि रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. ‌‌‌‌‌वाझे आता कोणतंही कारण देऊन त्यावरुन समाजमन तापवण्याचा प्रयत्न करत आहे का? आणि त्यातुन सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न होतो आहे का? वाझेचे गुन्हे गंभीर आहेत, देशाच्या महान उ्दयोगपतीला मारण्याचा कट करणे, त्या कटात सहभागी होणा-यांची हत्या करणे, वसुली करणे असे अनेक आरोप वाझेवर आहेत. अशा व्यक्तिच्या ‌‌‌जीवाची आणि एनआयएच्या तपासात स्टेन स्वामीचा मुद्दा समोर आणुन, आता लोक आपल्या तपासयंत्रणांवर आरोप करायला लागतील, कादचित त्यासाठीच वाझेने हा मुद्दा समोर आणला आहे.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.