४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत लसीकरणास प्रारंभ

लातूर शहर मनपाच्या वतीने ४५ व त्यापेक्षा अधिक वय असणारे सर्वजण कोरोना लस घेऊ शकणार आहेत.

४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत लसीकरणास प्रारंभ

लातूर: लातूर शहर मनपाच्या वतीने ४५ व त्यापेक्षा अधिक वय असणारे सर्वजण कोरोना लस घेऊ शकणार आहेत.(On behalf of Latur City Corporation, everyone aged 45 and above will be able to get corona vaccine.) शहर महानगरपालिकेच्या वतीने पटेल चौक येथील नागरी आरोग्य केंद्र, राजीव नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, कम्युनिटी हॉल, आदर्श कॉलनी, औषधी भवन, विलासराव देशमुख आयुर्विज्ञान केंद्र व जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मोफत लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी लसीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी या केंद्राकरीता विशेष सहकार्य केले.

कोरोना च्या संकटातून संपूर्णपणे बाहेर पडण्यासाठी १००% लोकसंख्येचे लसीकरण होणं आवश्यक आहे. भारतात बनलेल्या दोन्ही लस संपूर्णतः सुरक्षित आहेत. ४५ वर्षांपुढील नागरिकांना माझे नम्र आवाहन आहे की आपण लवकरात लवकर लस घ्यावी. www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन किंवा लसीकरण केंद्रावर थेट जाऊनही आपण लस घेता येईल, अशी माहिती विक्रांत गोजमगुंडे व चंद्रकांत बिराजदार यांनी दिली...


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.