जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा- आ.रोहित पवार

1 min read

जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा- आ.रोहित पवार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यातील जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा, अशी मागणी केली होती. आता रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करण्याची मागणी केली आहे. याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यातील जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा, अशी मागणी केली होती.आता रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.
‘कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही, काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जिम/क्लास चालक घेत असतील. तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा ही विनंती. सरकारकडून निर्णय घेतला जाईल असा विश्वास आहे,’ असं रोहित पवार ट्विट यांनी म्हटलं आहे.
WhatsApp-Image-2020-09-22-at-12.29.06-PM
रोहित पवार यांच्या आधी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी जिम आणि रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी केली होती. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं होत. यात जिम, रेस्टॉरंटचाही सामावेश होता. परंतू आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. राज्यातील जिम चालकांनी त्यात मोठी गुंतवणूक केली आहे, असं सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. जिम चालकांनीही सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. लॉकडाऊनमुळे जिम व्यवसाय डबघाईला आल्याचं त्यांनी सुळे यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांना जिम चालकांची व्यथा सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचं आश्वासनही दिलं होतं.