आर्य वैश्य महासभेची राज्य कार्यकारीणी जाहीर

समाजाचे संघटन वाढवण्यासाठी नियोजन करून प्रथमच संघटन प्रमुख पदाची निर्मिती महासभेने केली

आर्य वैश्य महासभेची राज्य कार्यकारीणी जाहीर

परभणी: आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली दरम्यान समाजाचे संघटन वाढवण्यासाठी नियोजन करून प्रथमच संघटन प्रमुख पदाची निर्मिती महासभेने केली आहे.

यापुर्वी प्रसिद्धी प्रमुख असलेले प्रदिप कोकडवार यांची राज्य संघटन प्रमुख म्हणून नियुक्ती केली तर प्रसिद्धी प्रमुख म्हणुन नरेंद्र येरावार उमरी यांची निवड केली आहे. गुरुवार 7 ऑक्टोबर रोजी कन्यका परमेश्वरी मातेचे पूजन, आरती व घटस्थापनेनंतर महासभेची कार्यकारिणी महासचिव गोविंद बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते नांदेड, सूर्यकांत सिरपेवार औरंगाबाद, नंदकुमार मडगुलवार मुखेड, सुधीर पाटील परभणी, प्रशांत निलावार पूणे, जयंत बोंगीरवार चंद्रपूर, सहसचिव
अभय कोकड माजलगाव,सदानंद मेडेवार नांदेड, प्रकाश कलकोटे सोलापूर, सहकोषाध्यक्ष गजानन चिद्रवार उदगीर, गणेश गंगमवार नांदेड, किरण वट्टमवार लोहा, संजय पांपटवार नांदेड संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार जिंतूर, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार उमरी, विजय बंडेवार नांदेड, विजय निलावार हिंगोली, हिशोब तपासणीस नागनाथ पारसेवार परळी, यांची निवड केली आहे.तर सदस्य म्हणून दिनकर चाडावार किनवट, प्रणव मनूरवार नांदेड, दिलीप तेललवार भोकर, अभिजीत चिद्रवार पूसद, रवींद्र लिंगावार औरंगाबाद, अरुण चालीकवार नांदेड,
साईनाथ मेडेवार नायगाव, साईनाथ गादेवार अहमदपूर, ज्ञानेश्वर मामडे हिंगोली, मनीष माणिकवार उमरगा, राजेंद्र कुंचमवार लातूर, राजेश्वर कमटलवार नांदेड, गोपाळ मुक्कावार उमरखेड, अजित भावठाणकर माजलगाव, दिगंबर कौरवार देगलूर, रमेश पेकम गंगाखेड, राजेश्वर रायेवार हदगाव, प्रमोद मुरकेवार नाशिक, पांडुरंग बिडवई, चंद्रकांत बासटवार नांदेड, लक्ष्मीकांत पारसेवार मुंबई, अभिनय कामाजी सांगली, प्रल्हाद काशेटवार नांदेड,
अनिल चिद्दरवार धारूर, भागवत येरावार जालना, राजू मोतेवार नांदेड, अनिल वट्टमवार कंधार, राजकुमार देवशेटवार देवणी, श्यामसुंदर पांपटवार सोनपेठ आदींची निवड केली आहे. बांधकाम समिती अध्यक्षपदी भानुदास वट्टमवार पुणे यांची तर उपाध्यक्षपदी दिगंबर लाभसेटवार नांदेड, किरण वट्टमवार जिंतूर, गणेश चक्करवार नागपूर, दत्तात्रेय पईतवार नांदेड, निखिल चिद्दरवार पूसद, विकास दुबे परळी तसेच सचिव ज्ञानेश्वर महाजन नांदेड, सहसचिव गजानन दुबे धारूर,विशाल नारलावार पालम, कोषाध्यक्ष अनिल मनाठकर नांदेड, सह-कोषाध्यक्ष डॉ. नरेश रायेवार नांदेड, रामनाथ तुप्तेवार नांदेड तर सदस्य म्हणून शंकर देबडवार नांदेड, रमाकांत रायेवार जळकोट, भागवत गंगमवार नांदेड, चंद्रकांत गुंडाळे पुणे, माणिक बट्टेवार लातूर, माणिक शेट्टे माजलगाव, सुधाकर कोडगिरे लातूर, विपिन गादेवार नांदेड, महेश पत्तेवार उमरखेड, नामदेव कटकमवार लोहा, सुरेश माणिकवार उमरगा, अनिल मुगटकर वसमत, राजेश कोटलवार पूसद, गोविंद देबडवार बार्शी, राजेश्वर उत्तरवार कुंडलवाडी, विठ्ठल बंडेवार नांदेड, प्रदीप मनाठकर नांदेड, अमर पारसवार सोलापूर, सल्लागार म्हणून एकनाथराव मामडे, डॉ. ज्ञानेश्वर मुखेडकर, अॕड. दिलीप मनाठकर, अभय लोकमनवार यांची निवड केली आहे. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेवर निवड करण्यात आलेले पदाधिकारी व सदस्यांचा कालावधी 2021 ते 2024 असा तीन वर्ष असेल. महासभेची ध्येयधोरणे आणि समाजहिताच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेली कामे यशस्वीरित्या पार पाडण्याचे आवाहन महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.यात सर्व जिल्ह्यातील समाज बांधवांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महासभेवर निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.