गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचना जारी, पहा संपुर्ण नियमावली

कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचना जारी, पहा संपुर्ण नियमावली

मुंबई : राज्यात कोविड-१९ च्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे.गृहविभागाकडून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. यामध्ये मागील वर्षीप्रमाणे यंदाही सारखेच नियम लागू करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी अशी असेल नवीन नियमावली :

गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.

कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.

सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी

विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.

नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.

शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.

सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत

आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.

नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.

गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.