शाळा सूरु करण्याची राज्य शासनाची तयारी - मंत्री बच्चू कडू

1 min read

शाळा सूरु करण्याची राज्य शासनाची तयारी - मंत्री बच्चू कडू

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे.

अमरावती:- कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मात्र, आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे. शाळा सुरू करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. यामध्ये शाळेत येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा निर्जंतुकीकरण करण्यात येईल आणि पूर्ण खबरदारी घेऊनच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.