गोदाकाठच्या रस्त्यासाठी अशोक चव्हाणांना निवेदन,प्रशासनाचे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

1 min read

गोदाकाठच्या रस्त्यासाठी अशोक चव्हाणांना निवेदन,प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना गोदाकाठच्या नागरीकांनी निवेदन दिले.

सिध्देश्वर गिरी/परभणी: सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या रस्त्याची मोठी दुर्दशा झाल्याने गोदाकाठच्या गावांना मोठ्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात चार महिने ही दहा गावे संपर्क विहीन होतात. या रस्त्याच्या निर्मितीसाठी गोदाकाठच्या गावांनी तीव्र आंदोलने केल.ी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार सुध्दा घातला होता. पण दुदैवाने प्रशासनाने या दहा गावांच्या समस्या जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे .
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोकराव चव्हाण हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना दि.३० रोजी परभणी येथील व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत गोदाकाठच्या नागरीकांनी त्यांना गोदाकाठच्या रस्त्यासाठी साकडे घातले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन देऊन गोदाकाठ च्या नागरीकांनी राष्ट्रीय महामार्ग ५४८ ब ला विटा पुलाला जोडणारा इतर जिल्हा मार्ग क्र २५ हा राज्य महामार्ग २३५ ला शिर्शीपुलाला जोडणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करुन तातडीने तयार करुन देण्यासाठी निवेदन दिले. या निवेदनावर उमेश कदम,अनिल रोडे,सोमनाथ नागुरे,अशोक चांदवडे,अनंत भंडारे,अंगद कारकर,संदीप नागुरे,सुर्यकांत कदम,संदीप रोडे,दिलीप रोडे,अंकुश मुलगीर,मंगेश रोडे,रामेश्वर कदम,विठ्ठल परांडे,प्रमोद रोडे,विकास ढमे,संदीप रोडे,जगन्नाथ कोलते यांच्या स्वाक्षःया आहेत. तर यावेळी कॉग्रेसचे अँड.हनुमंत जाधव यांचीही उपस्थिती होती.