ठाकरे सरकारचा अजब कारभार हरबल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा

दारू वरच्या एक्साईज ड्युटीवरुन खोतांची ठाकरे सरकारवरती टिका.

ठाकरे सरकारचा अजब कारभार हरबल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा

मुंबई : राज्य सरकारने तळीरामांना दिलासा दिला आहे. परदेशातून होणाऱ्या स्काॅचवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या निर्णयामुळे स्कॉच-व्हिस्कीवर असलेला उत्पादन खर्चावरील ३०० टक्के कर हा १५० टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सरकारवर निशाणा साधाला आहे.

सदाभाऊ खोत यांनी ट्टिट मध्ये म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने दारू वरची एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी कमी केली. महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार हरबल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा. एक्साईज ड्युटी कमी करून आता सरकारने दारू पिण्यासाठी लोकांना प्रोसाहित करण्याचे काम हातात घेतले आहे. अशी टिका सदाभाऊ खोत यांनी सरकारवर केली आहे.

राज्य शासनाने याबाबतचा अध्यादेश गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारला परदेशातून आयात केलेल्या स्कॉच-व्हिस्कीच्या विक्रीतून दरवर्षी १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता करात कपात केल्याने या महसूलात वाढ होण्याची शक्यता आहे. परदेशी स्कॉच-व्हिस्कीच्या विक्रीतून सरकारला २५० कोटी रुपयापर्यंत महसूल मिळण्याची शक्यता आहे. मद्य स्वस्त होणार असल्यामुळे परदेशी स्कॉच-व्हिस्कीचा खप दररोज एक लाख बाटल्यांवरून अडीच लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज अधिकाऱ्याने वर्तवला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.