विनामास्क बाहेर पडल्यास कठोर कारवाई

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास रोख बसावा म्हणून नागरिकांनी उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे

विनामास्क बाहेर पडल्यास कठोर कारवाई

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास रोख बसावा म्हणून नागरिकांनी उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे असून नागरिक, व्यापाऱ्यांनी मास्कचा वापर करावा, अन्यथा कठोर दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिला आहे.

संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात कोरोनाबांधित रुग्णसंख्येत मोठी वाढ आहे. यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच मास्कचा वापर करण्याबाबत नागरिक, शहरातील व्यापारी आस्थापनांना वारंवार सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत विनामास्कने नागरिक फिरू लागले आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांनी सतत मास्कच वापरावा, विना मास्क असलेल्या ग्राहकास दुकानात प्रवेश देऊ नये, तसेच व्यापाऱ्यांनी व तेथील कामगारांनी मास्कचा वापर सातत्याने करावा, मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरत असलेल्या व्यक्तिंवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी म्हटले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.