औरंगाबादेत पुन्हा कडक लॉकडाउन?

शहरात कोरोना संसर्गाचा आकडा दिवसाकाठी ५०० च्या जवळ पोहचत आहे. त्याबरोबरच कोरोना मुळे होणाऱ्या मृत्युचेही प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद लॉकडाउन संदर्भात सोमवारी बैठक होणार आहे.

औरंगाबादेत पुन्हा कडक लॉकडाउन?

सुमित दंडुके/औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद मध्ये लॉकडाउन संदर्भात सोमवारी बैठक होणार आहे. ८ ते १० दिवसांचा कडक‌‌ लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरीष्ठ सूत्रांनी दिली आहे. शहरात वाढता कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.शहरात कोरोना संसर्गाचा आकडा दिवसाकाठी ५०० च्या जवळ पोहचत आहे. त्याबरोबरच कोरोना मुळे होणाऱ्या मृत्युचेही प्रमाण वाढले आहे. काल दि.०६ रोजी दिवसभरात तब्बल ४५९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर ५ जणांचा मृत्यु झाला आहे.खबरदारी म्हणून प्रशासनाने रात्र संचारबंदी लागू केलेली आहे. पण याचा परिणाम रुग्णसंख्येवर अद्याप दिसून आलेला नाही. जी रुग्णसंख्या दिवसाला ५० च्या आत होती ती आता ५०० च्या आसपास जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात  ८ ते १० कडक लॉकडाउन कारण्यात येणार असल्याची माहिती आहे.

लॉकडाऊन संदर्भात शहरात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन लागणार अशी बातमी सगळ्याच वृत्तवाहीन्यांवर दिसत आहे. मात्र जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यासंदर्भात कळविले आहे की, शहरात असे अचानक लॉकडाऊन लागणार नाही, यासंदर्भात येत्या एक दोन दिवसात मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासोबत बैठक होईल त्यानंतर लॉकडाऊन किती दिवसांचा आणि कशाप्रकारे होईल हे स्पष्ट करण्यात येईल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.