राज्यात कडक लॉकडाऊन ,घोषणे कडे सर्वांच लक्ष

१५ एप्रिल ते ३० एप्रिल असा लॉकडाउनचा कालावधी असू शकतो.

राज्यात कडक लॉकडाऊन ,घोषणे कडे सर्वांच लक्ष

मुंबईः कोरोनाचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढ आहे. त्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन करण्याबाबत राज्य सरकारने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. मात्र, नागरिकांना याची कल्पना देऊन दोन दिवसांचा अवधी देऊन मग लॉकडाउन करावे असे नागरीकांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती, तर सोमवारी टास्क फोर्सची बैठक घेऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. करोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे सर्वच अधिकाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याबाबत राज्य सरकारने निश्चित केले आहे.

मात्र, हा लॉकडाउन आठ दिवसांचा हवा, की १५ दिवसांचा याविषयी अजूनही दुमत आहे. मंगळवारी गुढीपाडवा आणि बुधवारी डॉ. बाबासोहब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे हे दोन्ही दिवस सोडून गुरुवारी १५ एप्रिल रोजी लॉकडाउन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. १५ एप्रिल ते ३० एप्रिल असा लॉकडाउनचा कालावधी असू शकतो. १ मे रोजी सरकारी सुट्टी असल्याने २ मे पासून पुन्हा राज्यातील परिस्थिती पूर्ववत करता येऊ शकते. मात्र, विरोधकांनी तयारी न दर्शविल्यास लॉकडाउनचा कालावधी कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.