राज्यात कडक लॉकडाउन,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच घोषणा करणार?

हा लॉकडाऊनही गेल्या वेळेप्रमाणे लॉकडाऊनसारखाच कडक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

राज्यात कडक लॉकडाउन,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच घोषणा करणार?

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाला आहे. कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या वाढतच असल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, बुधवारी यासंदर्भातील घोषणा करणार आहेत.

राज्यात करोनारुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, ऑक्सिजनची कमतरता आणि औषधांचा तुटवडा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने गेल्या वर्षीप्रमाणे कडक लॉकडाउन करावा, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत झाली. या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुढील 15 दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.
+
मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांचा दबाव

राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाउनबाबत आजच निर्णय घ्या असा दबाव मंत्र्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टाकल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

'गेल्या वेळी लॉकडाउन मागे घ्या, असे काही मंत्रीच म्हणायचे. मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. सगळे नियंत्रणाबाहेर जात आहे. पेटणाऱ्या चिता शांत झोप लागू देत नाहीत. त्यामुळे लॉकडाउन करण्याची सूचना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. लोक घराबाहेर पडू नयेत यासाठी जे करता येईल ते करावे लागेल,' असेही आव्हाड म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.