पुण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी कडक निर्बंध

गणपती विसर्जनाच्या दिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.

पुण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी कडक निर्बंध

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी पुण्यात अनंत चतुर्दशीला कडक निर्बध लावले जाणार आहेत.अनंत चतुर्दशीला पुण्यात केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. गणपती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी झाल्याने कोविड संसर्ग पसरण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे आणि आसपासच्या परिसरात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.