हिंगोली शहर पोलिसांची दमदार कामगिरी

मोक्कातील आणखी दोन आरोपी जेरबंद करण्यात यश...

हिंगोली शहर पोलिसांची दमदार कामगिरी

हिंगोली : न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून फरार झालेल्या दोन आरोपींना तब्बल अडीच हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करून उत्तर प्रदेशातून जेरबंद करण्यात हिंगोली शहर पोलिसांना यश आले आहे. याबद्दल पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषद घेत तपासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

गंभीर गुन्ह्यात आरोपी असणारे लक्ष्मण नागरे व भागवत बांगर या दोघांना १५ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु हजर न राहता हे दोन्ही आरोपी फरार झाले. सदर आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर त्यांच्या तपासाकरिता पथक रवाना करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून दोघांना ताब्यात घेतले. महाराजगंज येथील न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना आज हिंगोली येथे आणण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देत फिरणाऱ्या दोघांना अखेर शहर पोलिसांनी जेरबंद केले. यासाठी पोलिसांच्या पथकाला तब्बल 2600 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केनेकर, पोलीस कर्मचारी मुजीब, असलम, गारवे, बांगर यांच्या पथकाने ती कारवाई पार पडली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.