वृक्ष लागवडीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अभ्यास दौरा

वृक्ष लागवड करण्यासाठी जिल्ह्यातील अभ्यास दौऱ्याचे आयोजन

वृक्ष लागवडीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अभ्यास दौरा

परभणी : ग्रामीण भागात वृक्ष लागवडीच्या मोहिमेला गती यावी म्हणून जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी व परभणी तालुक्यातील ग्रामसेवकांची टीम रवाना झाली.

आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या इश्वेद बायोटेक प्रा.लि. या नर्सरी मधील विविध जातींच्या वृक्षांची पाहणी व परभणी जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यासाठी जिल्ह्यातील पंचायत विभागाचे सर्व विस्तार अधिकारी, परभणी तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर अभ्यास दौऱ्याचे नेतृत्व परभणी पं. स. चे विस्तार अधिकारी स्वप्निल पवार करत आहेत.

यावेळी इश्वेद नर्सरी मधील बांबू, जांभूळ, लिंबोणी, मोसंबी, संत्री, सीताफळ, केळी, किवी, चिंच, आंबा अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेल्या फळझाडांची माहिती इश्वेद बायोटेक प्रा.लि. चे संचालक संजय वायाळ हे देणार आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.