ग्रामपंचायतीत वृक्ष लागवड करण्याच्या सीईओंच्या सूचना

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वृक्ष लागवड कशी करता येईल यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी कर्मचाऱ्यांना कडक शब्दात सूचना

ग्रामपंचायतीत वृक्ष लागवड करण्याच्या सीईओंच्या सूचना

परभणी : जिल्ह्यातील परिषदेच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बिहार पॅटर्न पद्धतीने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वृक्ष लागवड करण्याबाबत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर व शेतात वृक्ष लागवडीबाबत देखील आवश्यक त्या सूचना दिल्या.

आज जिल्ह्यातील एमआरइजीएस विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वृक्ष लागवड कशी करता येईल यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी कर्मचाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ टक्के वृक्ष आच्छादन जंगलाचे प्रमाण असणे आवश्यक असताना सुमारे ४ टक्के एवढेच प्रमाण मराठवाड्यात आहे. या पार्श्वभूमीवर या वृक्षाचे प्रमाण वाढवण्यासाठी मनरेगा योजना संजीवनी ठरणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.