वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशीच सुहासिनींना धक्का

औरंगाबादमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, समर्थनगर, वाल्मी नाका, वाळूज येथे वेगवेगळ्या चोरट्यांकडून मंगळसुत्र चोरी...

वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशीच सुहासिनींना धक्का

औरंगाबाद : शहरात काल मंगळसुत्र चोरांनी धुमाकूळ घातला. दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी मंगळसुत्र चोरांनी तीन मंगळसुत्र हिसकावले. यामुळे पोलीसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी गुरुवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या महिलांना मंगळसूत्र चोरट्यांनी लक्ष्य केले. सात चोरट्यांनी तीन दुचाकींवरून अवघ्या एका तासात समर्थनगर, वाल्मी नाका व वाळूज येथून तीन महिलांची सोनसाखळी, मंगळसूत्रे हिसकावून नेली. विशेष म्हणजे पोलीसांनी खबरदारी घेऊनही या घटना घडल्याने चोरटे पोलीसांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे दिसत आहे.

मागील दीड वर्षांपासून मंगळसूत्र हिसकावणारे चाेरटे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. वटपौर्णिमेनिमित्त महिला पूजेसाठी सोन्याचे दागदागिने, मंगळसूत्र, सोनसाखळी परिधान करून बाहेर पडतात. चाेरट्यांनी हीच नामी संधी हेरत मंगळसुत्र हिसकावले. या घटनांनतर मात्र दिवसभर पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवत गस्त वाढवली.

तिन्ही घटना पुढीलप्रमाणे:

समर्थनगर येथील कसबेकर हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या स्वाती काळेगावकर सकाळी १०.३० वाजता झाडाची पूजा करण्यासाठी निघाल्या. सुंदर लॉज जवळून जाताना विना क्रमांकाच्या काळ्या पल्ससरवरून आलेल्या चाेरट्यांनी त्यांचे ४ तोळे अडीच ग्रॅमचे मनी मंगळसूत्र हिसकावले.

सिडको वाळूज महानगरातील नीलिमा मधुकर पोखरकर (३८) मैत्रिणींसह गणेशनगरातून पूजा आटोपून ११ वाजता पाइपलाइन रोडने जात हाेत्या. तेव्हा काळ्या रंगाच्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सहा तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून तोेडले.

पैठण रस्त्यावरील अमृत सारा सिटीतील शिक्षिका कविता दलसिंग घुण (३४) या ११.३० वाजता कांचनवाडी पूजेच्या साहित्य खरेदी करून मोपेडने घरी जात हाेत्या. वाल्मी गेट पुलाजवळ काळ्या रंगाच्या पल्सरवर ट्रिपल सीट आलेल्यांपैकी पाठीमागच्या चाेरट्यांने त्यांचे १५ ग्रॅम सोन्याचे गंठण हिसकावले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.