व्हॉट्सअपवर स्टेटस ठेऊन उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या

शहरातील भावसिंगपुरा येथील घटना, फायनान्स कंपनीत करत होता काम.

व्हॉट्सअपवर स्टेटस ठेऊन उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद: व्हॉट्सअपच्या स्टेटसला 'गुडबाय' असे लिहून एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे शहरात घडली. मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा तरुण औरंगाबादमधील फायनान्स कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. नागेश मधुकर तुरुकमाने असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला नागेश लहानपणापासून शहरातील भावसिंगपुरा येथील पेठेनगर भागात राहात होता. त्याचे एम.ए. पर्यंत शिक्षण झालेले होते. मंगळवारी रात्री मुंबईला कामानिमित्त गेलेल्या त्याच्या आत्या औरंगाबाद मधील रेल्वे स्टेशनवर आल्यावर त्यांनी नागेशला घेण्यासाठी ये, असा फोन केला. मात्र मी थकलो आहे, असे नागेशने त्यांना सांगितले. त्यामुळे आत्या नातेवाईकांच्या घरी झोपल्या.

त्यानंतर त्याने रात्री ३ वाजता व्हॉट्सअपचे स्टेटस बदलले व त्यात 'सूसाईड गुडबाय' असे लिहिले. तसेच हा मेसेज त्याने मावस भावालादेखील केला. त्यानंतर घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.

पहाटे झोपेतून उठल्यावर मावस भावाने त्याचा मॅसेज पाहिला व आत्याला याबाबत कल्पना दिली. आत्याने तातडीने घर गाठले तेव्हा आत नागेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.