सिद्धेश्वर गिरी / सोनपेठ: शहरातील विवाहीत तरुणी सीमा शाम चिंचाने हीने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोनपेठ शहरात घडली आहे. ऐन संक्रात सणाच्या दिवशी झालेल्या या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विवाहित तरुणीच्या लहान भावाची लग्नानंतर झालेली पती-पत्नीतील विसंगता आणि त्यातून देण्यात आलेल्या सोडचिठ्ठीमुळे आपल्या भावाचे कसे होईल या विवंचनेतून या तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती तरुणीचा भाऊ अशोक गायकवाड यांनी दिली आहे. फोटोग्राफी व्यवसाय करणारा शाम दत्तात्रय चिंचाने यांची ती तरुणी पत्नी होय. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भिसे,वंजारे करत आहेत.