तरुण पत्रकाराची आत्महत्या

घरातच घेतला गळफास

तरुण पत्रकाराची आत्महत्या

परभणी: परभणी येथील दै. दिलासाचे प्रतिनिधी अरुण हिसवनकर यांनी शनिवार दि.17 रोजी सकाळी 9 च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अरुण हिसवनकर यांनी दै. सकाळमध्ये 22 वर्ष काम केले होते. कोरोना काळात ते दै.दिलासामध्ये काम करत होते. मनमिळावू, सतत हसतमुख हिसवनकर यांच्या आत्महत्येने पत्रकारिता क्षेत्रात खळबळ ऊडाली आहे. दरम्यान सकाळच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्‍वर तट यांनी घटनास्थळी भेट दिली. हिसवनकर यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्‍चात एक बहिण, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.