सुनेला सासू सासऱ्यांच्या घरात राहण्याचा हक्क - सुप्रीम कोर्ट

1 min read

सुनेला सासू सासऱ्यांच्या घरात राहण्याचा हक्क - सुप्रीम कोर्ट

तरुण बत्रा प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे म्हटले होते की, कायद्यानुसार मुली आपल्या पतीच्या आईवडिलांच्या मालमत्तेत राहू शकत नाहीत. पम आता सुप्रीम कोर्टाने या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय पलटविला आहे.

नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टाने आज सुनेच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत सुनेला तिच्या पतीच्या आईवडिलांच्या घरात राहण्याचा हक्क आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने तरुण बत्रा प्रकरणातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय पलटविला.

विशेष म्हणजे तरुण बत्रा प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे म्हटले होते की, कायद्यानुसार मुली आपल्या पतीच्या आईवडिलांच्या मालमत्तेत राहू शकत नाहीत. आता तीन सदस्यांच्या खंडपीठाने तरुण बत्राच्या निर्णयाला उलटसुलट ठरवून 6-7 प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. कोर्टाने सांगितले की, मुलीचा फक्त पतीच्या स्वतंत्र मालमत्तेतच नव्हे तर सामायिक घरात देखील हक्क आहे.