सुपारी किलर निलंगा पोलिसांच्या जाळ्यात

निलंगा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

सुपारी किलर निलंगा पोलिसांच्या जाळ्यात

निलंगा/प्रतिनिधी : शहरातील एका व्यापाऱ्याला मारण्यासाठी हत्यारे घेऊन आलेल्या सुपारी किलरला चारचाकी गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.

लातूर  शहरातील जुन्या गाडीचे व्यवहार करणारे व्यापारी उमर करीम पटेल शेख (रा. खोरे गल्ली लातूर) यांच्या सांगण्यावरून निलंगा शहरातील एका व्यापाऱ्याकडून पैसे वसूल करण्यासाठी उमर अब्दुल साब शेख (रा. हत्तेनगर, लातूर) यांच्यासह अहमद जिलानी शेख वय २४ वर्षे (रा. न्यु काझी मोहल्ला, लातूर), अखील रहेमानसाब बिरादार वय २६ वर्षे (रा. इंडिया नगर, गल्ली नंबर १ लातूर), विजय साहेबराव करवंजे वय १६ (रा. नरसिंग नगर, इंडिया नगर जवळ, लातूर), महेश वसंत वाघमारे वय २२ वर्षे (रा. सुभेदार रामजी नगर लातूर), नागेश लक्ष्मण सुरवसे वय २५ वर्षे (सुभेदार रामजी नगर, लातूर) हे पाच जण दुपारी ३.१५  वाजता शहरातील दत्त नगर प.स.कार्यालयासमोर एम.एच.२४ सी.९३६३ या नंबरच्या इनोव्हा गाडी मध्ये दबा धरुन बसले  होते. दिशान देशमुख (रा. दत्त नगर) यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हे पाच सुपारी किलर आले होते. खब-याकडून निलंगा पोलिसांना माहिती कळताच स्वतः पोलिस निरीक्षक अनिल चोरमले व शितल सिंदाळकर, राजकुमार नागमोडे, प्रणव काळे, हणमंत पडीले यांनी फौज फाट्यासह सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या व सदरील पाच आरोपीना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरील पाचजण हे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक असून त्यांच्याकडे दोन चाकू, एक गुप्ती, एक सुत्तर यासह पाच लाकडी दांडके सापडले आहेत, त्यांच्यावर लातूर येथील पोलिस ठाण्यात अनेक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना सापळा रचून अटक केली नसती तर शहरात मोठा अनर्थ घडला असता. निलंगा व लातूर येथील दोन्ही व्यापारी हे जुन्या गाड्यांचा व्यापार करत होते. परंतु एका गाडी मध्ये निलंगा येथील व्यापारी दानिश देशमुख यांना तोटा झाला व यातूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.सदरील दोन्ही व्यापारी हे भाऊ असल्याची माहिती मिळत आहे. पैशाच्या व्यवहारातून दोन भाऊ एकमेकांच्या जीवावर बेतले होते या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.