अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका

अनिल देशमुखांचा शेवटचा पर्यायही बंद झाला आहे

अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका

नवी दिल्ली : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने मोठ झटका दिला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. मनी लाॅड्रिंग प्रकरणी सर्वाेच्च न्यायलयाने अनिल देशमुखा यांची याचिका फेटळली आहे. आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करु नये यासाठी अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केली होती.

याचिकेत अनिल देशमुखांनी म्हटले होते की, मनी लाॅड्रिंग प्रकरणात तपासला स्थगिती द्यावी, ईडीने पाठवलेले समन्स रद्द करावेत, अटकेसारखी गंभीर कारवाई करण्यास मनाई करवी इत्यादी मागण्य याचिकेत करण्यात आल्या होत्या पण सर्वोच्च न्यायलयाने देशमुखांची याचिका फेटाळली. आपण याबाबत सीआरपीसीच्या अनुषंगाने याचिका करावी,अशी सुचना न्यायलयाने केलीय.

सर्वाेच्च न्यायलयात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्या.ए.एम.खानविलकर, न्या. कुष्णा मुसरी आणि न्या.व्ही. रामासुब्रमण्यने यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.यावेळी सर्वोच्च न्यायलयाने देशमुखांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.