सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठा आरक्षण रद्द, निकालातील महत्तवाचे मुद्दे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील प्रमुख मुद्दे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठा आरक्षण रद्द, निकालातील महत्तवाचे मुद्दे

नवी दिल्लीः मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविले आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा गायकवाड आयोगाचा निष्कर्षही चुकीचा असल्याचे निरीक्षण पाच न्यायमूर्तींच्या पूर्ण पीठाने निकालात नोंदवले आहे. या निकालानंतर राज्यातील विरोधकांनी सरकारला घेरले असून मराठी संघटनांकडूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्र सरकारला धक्का बसला आहे.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, महाराष्ट्र सरकारला मोठा झटका
महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील प्रमुख मुद्दे :

  • मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणे घटनात्मक नाही.

  • मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे असे मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल किंवा गायकवाड आयोग तसेच सुनावणीदरम्यान झालेल्या युक्तीवादांवरुन वाटत नाही.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने चार निकालपत्रे दिली असली तर ५० टक्क्यांची मर्यादा न ओलांडण्यावर सर्वाचे एकमत आहे.

  • न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असले तरी, या कायद्यान्वये ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द होणार नाहीत

  • मराठा आरक्षणासाठी इंदिरा साहनी खटल्याने घालून दिलेल्या आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचा फेरआढावा घेण्यासारखी परिस्थिती नाही.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.