सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना फटकारले ; सीबीआय चौकशी होणार

सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठीही मोठा धक्कादायक

सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना  फटकारले ; सीबीआय चौकशी होणार

नवी दिल्लीः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत . त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप केला होता. यानंतर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केले. त्याचवेळी अ‍ॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे.

अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला, याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतत उरलेले नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
याप्रकरणात झालेले आरोप अतिश्य गंभीर आहेत. आयुक्तांपासून ते गृहमंत्र्यांबाबत सर्वांवरच गंभीर आरोप आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी उच्च न्यायालयाचा सीबीआय चौकशीचा निर्णय अयोग्य म्हणता येणार नाही. सीबीआय चौकशीचे आदेश आल्यानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. पण यापूर्वी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले तेव्हा ते पदावरच होते. याप्रकरणाचे एकूण गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

100 कोटी वसुली प्रकरण;अनिल देशमुखांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.