राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदाराचे निलंबन .

राज्यसभेत गोंधळ, उपसभापती हरीवंश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप या खासदारांवर आहे.

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदाराचे निलंबन .

नवी दिल्ली : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांचे एक आठवड्यासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे खासदार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत. कृषी विधेयकाच्या विरोधात विरोधी खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला आणि रुल बुक फाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्यसभचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे सात दिवसांसाठी निलंबन केले आहे.

'या' आठ खासदारांचं निलंबन
संजय सिंह (आम आदमी पक्ष)
राजीव सातव (काँग्रेस)
डेरेक ओ ब्रायन (तृणमूल काँग्रेस)
के के रगेश (माकप)
सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस)
रिपुन बोरा (काँग्रेस)
डोला सेन (तृणमूल काँग्रेस आणि एलामराम करीम (माकप)
या खासदारांना निलंबित केलं आहे. उपसभापती हरीवंश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप या खासदारांवर आहे. विरोधकांनी राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला होता, जो सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटळला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.