व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू सोनपेठमध्ये भीतीचे वातावरण

1 min read

व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू सोनपेठमध्ये भीतीचे वातावरण

झोपेचे सोंग घेतलेल्या आरोग्य यंत्रणेला जागे करण्याची गरज

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: सोनपेठमध्ये नुकतेच एका व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्या नंतरही आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील डिघोळ येथील विषबाधा प्रकरणावरून आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. तोच प्रत्यय पुन्हा आला असून १३ ऑगस्ट रोजी सोनपेठमध्ये एका व्यापाऱ्यास श्वसनाचा त्रास होत असल्याने. एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संशयित हालचाल आढळून आल्याने सदरील खाजगी डॉक्टरने ही माहिती शासकीय रुग्णालयास कळवली असता शासकीय रुग्णवाहिका व्यापारी रुग्णास घेऊन गेल्याने सोनपेठच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णवाहिकेच्या भीतीने व्यापारी दगावला अशी चर्चाही सोनपेठमध्ये जोर धरू लागली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे का?असा सवाल उपस्थित होऊ लागला असून गेंड्याची कातडी पांघरून आरोग्य यंत्रणा चालवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना झोपेच्या बाहेर काढण्याची गरज निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया सामान्यामधून व्यक्त होऊ लागली आहे.