स्वामी अग्निवेश यांचे देहावसान

1 min read

स्वामी अग्निवेश यांचे देहावसान

अण्णा हजारे यांच्या २०११ मधील आंदोलनात स्वामीजींनी सहभाग घेतला तसेच 'बिग बॉस' या बहुचर्चित टेलीव्हिजन शो मध्येही त्यांचा सहभाग राहिला.

प्रसिद्ध आर्य समाजी कार्यकर्ते व हरियाणाचे माजी शिक्षण  मंत्री स्वामी अग्निवेश (८० वर्ष) यांचे दिल्लीतील लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस इंस्टिट्यूटमध्ये शुक्रवारी ६.३० वा. निधन झाले. ते लिवर सिरोसिसने ग्रस्त होते....
स्वामी अग्निवेश यांनी राष्ट्रीय वेठबिगार मुक्ती मोर्चा संगठनेद्वारे वेठबिगारांच्या मुक्ततेसाठी भरीव कार्य केले असून त्यांनी १९७० साली आर्य सभा नावाचा राजकीय पक्षही स्थापन केला होता. १९७७ मध्ये ते हरियाणा विधान सभेवर निवडून आले.

अण्णा हजारे यांच्या २०११ मधील आंदोलनात स्वामीजींनी सहभाग घेतला तसेच 'बिग बॉस' या बहुचर्चित टेलीव्हिजन शो मध्येही त्यांचा सहभाग राहिला. ते कोणत्याही विषयावर स्पष्ट मत मांडत असत...