अनिल देशमुखांवर टांगती तलवार कोठडी की जामीन? आज फैसला

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख ईडी कोठडीत.

अनिल देशमुखांवर टांगती तलवार कोठडी की जामीन? आज फैसला

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आज ईडी कोठडी संपणार आहे. मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत सुनावलेली ईडीची कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे देशमुखांना जामीन मिळणार का पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.