सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: ग्रामपंचायतच्या मुदती संपूर्ण एक महिनाही उलटला नाही. तोच जुन्या सरपंचांनी मोठ्या प्रमाणात अपहार करत बोगस कामे केली, असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करत केलेल्या कामाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यात पाथरी तालुक्यातील बानेगाव येथील ग्रामपंचायतच्या विविध विकासकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून. या भ्रष्टाचाराची चौकशी करत दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य- कार्यकारी अधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,ग्रामपंचायत बानेगाव येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आल्याचे, कागदपत्रे दाखवत बिले उचलण्यात आली असून, प्रत्यक्षात मात्र काम करण्यात आलेले नाही.यासोबतच करण्यात आलेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून सदरची कामे बोगस व दर्जाहीन झाली आहेत. या आशयाची तक्रार पाथरीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे करुनही त्यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे या भ्रष्टाचारात वरिष्ठांचेही हात ओले असल्याचे सिद्ध होऊ लागले आहे. यामुळे संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणीही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर गणेश घोगरे यांची स्वाक्षरी आहे.
विकासकामे न करता आर्थिक मलिदा लाटणाऱ्या सरपंचासह ग्रामसेवकावर कार्यवाही करा.
विकासकामाची चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी.

Loading...