विजय कुलकर्णी: राज्यात कोरोना पोठोपाठ 'बर्ड फ्लू' हा नवीन रोग आला आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे हा रोग कसा होतो? तर बर्ड फ्लू हा कोंबड्याच्या पक्ष्यांच्या श्वसन संस्थेचा रोग आहे. जो की झपाट्याने वाढण्याची आणि मानवाला होण्याची शक्यता आहे. या रोगापासून वाचवण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो की अनेकांना पडला आहे, चिकन, मास व अंडी खाल्ली पाहिजेत की नाही? या बर्ड फ्लू बद्दल विगल्स पुणे येथील पशुवैद्यकीय सेवांचे प्रमुख व सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ.आनंद देशपांडे यांनी एनालायझर शी बोलताना दिलेली ही खास माहिती.
सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ.आनंद देशपांडे यांनी बर्ड फ्लू बद्दल मांडलेले प्रमुख मुद्दे
1) बर्ड फ्लू ला घाबरून जाण्याचे कारण नाही.
2) हा रोग कोंबड्याच्या पक्ष्यांच्या श्वसन संस्थेचा रोग आहे.
3) स्थलांतरीत पक्ष्यांच्या विष्ठेपासून हा रोग होतो.
4) कोंबड्यापासून मानवाला होण्याची शक्यता.
5) चिकन,मास, अंडी खाताना काळजी घेण्याचे आवाहन
6) मास्क,सॅनिटायझर या प्रतिबंधात्मक गोष्टीचा वापर करावा.
7) बर्ड फ्लू झपाट्याने पसरण्याची शक्यता
8) रोगाला घाबरून जाण्याचं कारण नाही.
9) रोागाला अटकाव करण्याची आपली क्षमता आहे.