पावसाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

पावसाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

पावसाळा सध्या सुरू आहे. पावसाळा म्हटलं की वातावरण बदलून अनेक छोटेमोठे आजार डोके वर काढतात. अशा वेळी आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साध्या व हलक्या आहारासोबतच नियमित योगा व प्राणायाम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घाण, कचरा व अस्वच्छतेमुळे रोगराई वेगाने पसरते. ताप, सर्दी, खोकला, मलेरिया, डेंग्यूसारखे जीवघेणे आजार वाढतात. शिवाय पित्ताचे व संधीवाताचेही आजार डोके वर काढतात. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आहारावर खूप काही अवलंबून असते. नियमित संतुलित व पौष्टिक आहारासोबतच घरांमध्ये स्वच्छता राखल्यास या आजारांपासून स्वतःचा व कुटुंबीयांचा बचाव करता येऊ शकतो. सध्या कोरोना काळ असल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचे अधिकाधिक सेवन करावे, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

अशी घ्या पावसाळ्यात काळजी

घराबाहेर पडताना शक्यतो छत्री किंवा रेनकोटचा वापर करा

पावसात भिजणे सहसा टाळा

ओले कपडे अंगावर अधिक वेळ ठेवू नये

पावसात भिजून घरी आल्यानंतर प्रथम गरम पाण्याने आंघोळ करून मगच कोरडे कपडे घाला

आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकल्यास त्वचेच्या आजारापासून बचाव करता येऊ शकतो

केस व ओले कपडे असताना थंड जागेत जाणे टाळावे, त्यामुळे ताप, सर्दी, खोकल्यासारखे आजार होऊ शकतात

विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नका

साबणाने हात स्वच्छ धुवा

सकाळी नियमित व्यायाम व प्राणायाम करा

घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा

- आहाराविषयी घ्यावयाची काळजी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हलका आहार घ्या

शिजवलेलेच साधे अन्नपदार्थ खा

बाहेरचे चमचमीत खाद्यपदार्थ खाणे सहसा टाळा

उघड्यावरील किंवा शिळे अन्नपदार्थ खाऊ नका

फूटपाथवरील फळांचे रस, बर्फमिश्रित द्रव्य पदार्थ, कुल्फी, आईसक्रीम खाणे शक्यतो टाळा

मसालेदार, तळलेले पदार्थ खाऊ नका

अती आंबट व थंड पदार्थांचे सेवन टाळा

आहारात अद्रक व गवती चहाचा समावेश करा

पाणी शक्यतो उकळून व गाळून प्या

फ्रीजमधील पाणी अजिबात पिऊ नका


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.