उद्योगपतींना मारहाण करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करा- सुभाष देसाई

उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी, मागण्या जाणून घेणार...

उद्योगपतींना मारहाण करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करा- सुभाष देसाई

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीतील नित्यानंद भोगले या उद्योजकांना काही गुंडांकडून कंपनीत घुसून मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर उद्योजकांना गुंडाकडून होणारा त्रास, ब्लॅकमेलिंगचे प्रकार थांबवण्याची मागणी औद्योगिक संघटनाकडून होत आहे. सुरक्षित वातावरण मिळणार नसेल तर आम्ही आमचे उद्योग इतर राज्यात का नेऊ नये? असा संतापही या मारहाणीच्या घटनेनंतर उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

या मारहाण प्रकरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, देसाई यांनी औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांना आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असली तरी अद्याप मुख्य आरोपी फरार असल्याचे समजते.

दरम्यान, उद्योजकांना गुंडाकडून झालेल्या मारहाणी संदर्भात बोलतांना सुभाष देसाई म्हणाले, हा प्रकार गंभीर आहे, औरंगाबाद सारखे शहर उद्योगात भरारी घेत असतांना, इथे मोठ्या प्रमाणात बाहेरची गुंतवणूक, कंपन्या येत असतांना अशा गुंडगिरीच्या प्रकारामुळे या प्रक्रियेला गालबोट लागू शकते. उद्योजकांना चांगले वातावरण मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात अशा गुंडगिरीला अद्याप थारा दिला जाणार नाही. उद्योगपतींना मारहाण करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत. शिवाय लवकरच औरंगाबादला जाऊन मी उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी, मागण्या जाणून घेणार असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.