कमबॅक करण्यासाठी तनुश्री दत्तचा नवीन लुक..

1 min read

कमबॅक करण्यासाठी तनुश्री दत्तचा नवीन लुक..

२०१० पासून चित्रपटांपासून दूर असलेली तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर पोस्ट लिहून कमबॅक करत असल्याचा खुलासा केला आहे.

२०१८ मध्ये मीटू ची चळवळ सुरु करून नाना पाटेकर यांच्यावर आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता आता पुन्हा तीच्या व्हायरल फोटो मुळे चर्चेत आली आहे. २०१० पासून चित्रपटांपासून दूर असलेली तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर पोस्ट लिहून कमबॅक करत असल्याचा खुलासा केला आहे. तनुश्रीने इंस्टाग्राम वर तिच्या नवीन लुक चे फोटोसशेयर केले आहे, ज्यामध्ये तिने पूर्वीपेक्षा १५ किलो वजन कमी केले आहे. तिचे वय सध्या ३६ आहे . tkfjvh
"मी गेल्या काही वर्षांपासून चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे सिनेसृष्टीपासून दूर होते. परंतु आता मी माझा निर्णय बदलला आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय मी घेतला आहे." अशा आशयाची पोस्ट तनुश्रीने शेअर केली आहे.
'मला चित्रपट आणि वेब सीरिजच्या काही चांगल्या ऑफर्स येत आहेत. सध्या मी 3 मोठ्या साउथ फिल्म मॅनेजर्स आणि मुंबईतील 12 कास्टिंग ऑफिसच्या संपर्कात आहे जे बिग बजेट साऊथ प्रोजेक्ट्स आणि चित्रपटांसाठी मला मदत करतील', असेही तनुश्रीने सांगितले.